Saturday, February 15, 2020

ॲप चे वंडरलँड : 2.एअरड्रॉइड ॲप (AirDroid) एक सुपर ॲप

1 comments
नमस्कार मित्रांनो ,
 ॲप चे वंडरलँड मध्ये आपले पुनश्च एकदा स्वागत.
एयरड्रॉईड हे ॲप  वापरुन संगणकावर स्क्रीन कास्टिंग कशी करावी याबद्दल यापूर्वीही एक लेख या ब्लॉगवर प्रसिद्ध केला होता. पण लेख पोस्ट केल्यापासुन आतापर्यंत एयरड्रॉईड ॲप मध्ये बराच बदल झाला आहे. अनेक नवीन व अत्याधुनिक सुविधाही यात देण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधांची एकत्र व सविस्तर ओळख व्हावी म्हणून या ॲप वर आधारित आणखी एक पोस्ट या लेखमालेच्या निमित्ताने करत आहे. काळानुसार जरी ॲप मध्ये अनेक नवनवीन सुविधा वाढत गेल्या असल्या तरी खर्‍या अर्थाने एयरड्रॉईड ॲपला सुपर ॲप बनवतात त्या यामध्ये असणार्‍या दोन हटके फीचर्स ..........
ती म्हणजे मोबाइल टेदरिंग द्वारे कोणतेही केबल न जोडता,संगणकावर कोणतेही क्लाइंट सॉफ्टवेअर इन्स्टॉल न करता वायफाय आणि संगणकातील  ब्राउजर द्वारे मोबाइल संगणकाला जोडून मोबाइल मधील जवळ जवळ सर्व फीचर्स संगणकाद्वारे हाताळता येणे.
आणि दुसरे म्हणजे सामायिक क्लिपबोर्ड ......
( मोबाइलच्या व्हाट्सॲप, किंवा इतर ठिकाणावरील कॉपी केलेला टेक्स्ट मेसेज अथवा लिंक संगणकावर सलेक्ट करून पेस्ट करता येणे व संगणकावर कॉपी करून ते मोबाइल मध्ये पेस्ट करण्यासाठी पाठवण्याची सुविधा)
 
चला तर पाहूया

एअरड्रॉइड ॲप (AirDroid) द्वारे मोबाइल संगणकाशी कसा जोडावा?


1.प्रथमतः प्ले स्टोअर वरून एयरड्रॉईड(AirDroid) हे ॲप डाऊनलोड करून घ्या.

2. ॲप डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा ॲप सुरू केल्यावर ॲप ची माहिती देणारी स्क्रीन येईल व त्यात साईन अप करण्यासाठी अथवा आपले आधीचे एअरड्रॉइड  मध्ये अकाऊंट असल्यास लॉग इन करायला सांगितले जाईल. येथे तुम्ही साईन इन न करता वरच्या बाजूला उजव्या कोपर्‍यात असणारे Skip हे बटन दाबून ॲप च्या मुख्य मेनू वर या. यानंतर  अनुमती मागणी डायलॉग येईल.  अनुमती बाबतची  प्रक्रिया पूर्ण करा.

3.मोबाईलचे हॉटस्पॉट चालू करा आणि संगणक  मोबाईलच्या हॉटस्पॉट ला जोडा.(संगणकावर वायफाय ची सुविधा नसेल तरीही मोबाइल मधील वायफाय हॉटस्पॉट चालू करा आणि यूएसबी टेदरिंग द्वारे मोबाइल आणि संगणक जोडून घ्या.) 
किंवा तुमचा मोबाईल आणि संगणक एकाच वाय-फाय हॉटस्पॉट ला जोडा.

 4. एयरड्रॉईड ॲप मोबाईल मध्ये चालू ठेवून अथवा मिनीमाइज करून संगणकाचे ब्राउजर उघडा (यावेळी ॲप चालू असणे अथवा फोन मध्ये बॅकग्राऊंडला मिनीमाइज स्थितीत चालू असणे आवश्यक आहे.) व त्यात तुमच्या मोबाईल मधील ॲप मध्ये दिसणारा  वेब अॅड्रेस टाका. तो खालील प्रमाणे दिसेल.
http://192.168.43.1:8888/
हा ऍड्रेस फक्त नमुन्याची आहे. तुमच्या बाबतीत यातील अंक वेगळे असू शकतात. तुमच्या ॲप मध्ये दिसणारा ऍड्रेसच जशाचा तास टाकावा.

5. ऍड्रेस टाकल्यानंतर मोबाईल मधील  एयरड्रॉईड ॲप मध्ये संगणकाशी जोडण्याची परवानगी मागणारे डायलॉग चालू होईल.  Accept बटन दाबून परवानगी द्या. परवानगी दिल्या बरोबर लगेच संगणकाच्या ब्राउजर मध्ये आपल्या मोबाईल मधील विविध फीचर्स चे एक्सेस देणारे विविध मेनू असणारे एक वेब पेज लोड होईल. त्यामध्ये फाईल मॅनेजर, कॅमेरा, कॉनटॅक्ट, मेसेज, कॉल लॉग, ॲप, व्हिडिओ, रिंगटोन, म्युझिक असे विविध मेनू दिसतील.या सर्व मेनू मधून मोबाइल मधील संबंधित फीचर संगणकावरुन वापरू शकतो.
वरीलपैकी काही मेनू (जसे स्क्रीन शॉट हा मेनू वापरुन स्क्रीन मिरर करण्यासाठी) पहिल्यांदा वापरताना फोन मध्ये एयरड्रॉईड ॲप काही परवानग्या मागेल. त्या पूर्ण कराव्या लागतात.



6. एयरड्रॉईड ॲप द्वारे फोन व संगणकाची जोडणी  करताना व नंतरही, फोन मधील नेट चालू नसले तरी चालेल फक्त फोन चे हॉटस्पॉट आणि गरज असल्यास यूएसबी टेदरिंग चालू करावे लागेल.


याशिवाय संगणकातील ब्राउझरच्या इंटरॅक्टिव एयरड्रॉईड पेज मध्ये उजव्या बाजूला टूल बॉक्स दिसेल या टूल बॉक्स मध्ये एकूण चार मेनू आहेत,
अनुक्रमे
समारी(Summery),
फाइल,
 यू आर एल( Url),
 क्लिपबोर्ड
आणि ॲप

वरील पैकी कोणत्याही मेनू वर क्लिक केल्यानंतर एक इनपुट बॉक्स येईल.


समरी या टूल मध्ये फोन ची एकूण मेमरी, वापरलेली मेमरी, बॅटरी चार्जिंग लेवल या गोष्टींची माहिती दिसेल.

फाइल या मेनू वर क्लिक केल्यास एक इनपुट बॉक्स येईल. संगणकावरील एखादी फाइल ड्रॅग ड्रॉप पद्धतीने या बॉक्स मध्ये टाकल्यास ती फोन मधील एयरड्रॉईड फोल्डर मध्ये आपोआप आपलोड होईल. अशा पद्धतीने अगदी सहजपणे आपण एखादी फाइल मोबाइल च्या मेमरी आमध्ये पाटहवू शकतो. हीच सुविधा फाइल मॅनेजर या मेनूमध्येही उपलब्ध आहे.

 यू आर एल( Url) मेन्यू मध्ये संगणकावरील एखादा यू आर एल (लिंक) पेस्ट करून समोरील बाणावर क्लिक केल्यास पेस्ट केलेली लिंक फोनच्या ब्राउझर मध्ये ओपन होईल.

क्लिप बोर्ड  या मेनूतील इनपुट बॉक्स मध्ये पूर्वी मोबाइल वर कॉपी केलेला मजकूर दिसेल. आपल्याला जर व्हाट्सअप अथवा इतर ॲप मधील एखादा महत्वाचा मजकूर किंवा एखादा महत्वाचा मेसेज संगणकावर जतन करून ठेवायचा असेल तर तो फोन मधील संबंधित ॲप उघडून फक्त कॉपी करा. आणि संगणकावरील ब्राउझरच्या इंटरॅक्टिव एयरड्रॉईड पेज मधील क्लिपबोर्ड च्या इनपुट बॉक्स समोरील रिलोड बटन वर क्लिक करा, फोन वर कॉपी केलेला मजकूर लगेच इनपुट बॉक्स मध्ये येईल. त्यातील हवा तो भाग अथवा Ctrl + A द्वारे सर्व मजकूर कॉपी करून संगणकावर कोठेही पेस्ट करता येऊ शकतो.
त्याच प्रमाणे संगणकावरील कॉपी केलेला एखादा मजकूर याच क्लिपबोर्ड च्या इनपुट बॉक्स मध्ये पेस्ट करून इनपुट बॉक्स च्या समोरील बाणावर क्लिक केल्यास तो मजकूर फोन च्या क्लिप बोर्ड वर जाईल. आता फोन वरील हवे ते ॲप उघडून(जसे की व्हाट्सअप मधील मेसेज टाइप करण्याची जागा) त्यात लॉन्ग प्रेस करून पेस्ट वर क्लिक करा. संगणकावरील मजकूर थेट संबंधित ॲप मध्ये जाईल.
अपडेट- अँड्रॉइड च्या नवीन व्हर्जन मध्ये क्लीपबोर्ड मधील माहिती सुविधा बंद सुरक्षा कारणासाठी  केली आहे.

 ॲप या मेनूतील इनपुट बॉक्स मध्ये संगणकातिल एखादी apk फाइल ड्रग-ड्रॉप करून ती फोन मध्ये इंस्टॉल करता येते.

वरील सर्व सुविधांव्यतिरिक्त एयरड्रॉईड ॲप मध्ये मोबाइल चे स्क्रीन रेकॉर्ड करून व्हिडिओ बनवण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

जर तुम्ही एयरड्रॉईड मध्ये साईनअप करून अकाउंट काढले तर यापेक्षा अधिक फीचर वापरण्यास दिली जातात, जसे फोन हरवल्यानंतर ट्रेक करणे,स्क्रीन कास्टिंग करताना संगणकावरून मोबाईला हाताळणे-नियंत्रित करणे, पण हे फीचर्स वापरण्यासाठी एयरड्रॉईड ॲप च्या वेबसाइट वर लॉग इन करून या सुविधा ऑनलाइन वापराव्या लागतात., तसेच या सुविधा वापरण्यासाठी डाटा वापरच्या मर्यादाही आहेत.
एयरड्रॉईड ॲप मध्ये वरील व्यतिरिक्त अधिक प्रीमियम सुविधाही आहेत त्याही आपण मासिक अथवा वार्षिक भाडे भरून वापरू शकतो.

एयरड्रॉईड(AirDroid) ॲप खालील लिंक वर क्लिक करून प्ले स्टोअर डाउनलोड करू शकता.

https://play.google.com/store/apps/details?id=com.sand.airdroid

टेलिग्राम चॅनल
https://t.me/TechGuruMarathi




1 comment: