Sunday, February 23, 2020

ॲपचे वंडरलँड : 3 - मायक्रोसॉफ्ट ऑफिस

2 comments

ॲपचे वंडरलँड  लेख मालिकेतील तिसर्‍या लेखामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे.
काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम साठी मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे अधिकृत मोबाइल वर्जन रिलीज केल्याचे जाहीर केले होते. पण सुरुवातीला ऑफिसचे हे ॲप फक्त अँड्रॉइड च्या लेटेस्ट म्हणजेच (Android 10) या ऑपरेटिंग सिस्टिम साठी रिलीज करण्यात आले होते .
पण नुकतेच मायक्रोसॉफ्टने 16 फेब्रुवारी रोजी अँड्रॉइड 10 च्याही पूर्वीच्या चार वर्जन साठी हे ॲप रिलीज केले आहे .म्हणजेच अँड्रॉइड मार्शमेलो आणि त्यापुढील अँड्रॉइड व्हर्जन असणार्‍या मोबाइल वरही आता आपल्याला मायक्रोसॉफ्ट चे अधिकृत ऑफिस ॲप इन्स्टॉल करता येणार आहे. म्हणजेच अँड्रॉइड मोबाइल वर वर्ड, एक्सेल, किंवा पावर पॉइंट च्या फाइल्स आपण आता मायक्रोसॉफ्ट ऑफिस च्या अधिकृत ॲप मध्येच ओपन किंवा एडिट करू शकणार आहोत. तसेच पीडीएफ फाइल्स ही यात ओपन करता येणार आहेत. याचा महत्वाचा फायदा म्हणजे ज्या सोयी wps ऑफिस व तत्सम ॲप मध्ये पेड(पैसे देऊन) वापरता येत असत त्या या ॲप मधून मोफत वापरता येणार आहेत. मायक्रोसॉफ्ट चे अधिकृत ॲप असल्यामुळे फाइल संगणकावरुन मोबाइल वर व मोबाइल वरुन संगणकावर घेतल्यानंतर होणारा फाइल मधील बदल व चुका कमी होणार आहेत.
यापूर्वीही मायक्रोसॉफ्ट ची वर्ड, एक्सेल व पावर पॉइंट साठीची स्वतंत्र ॲप्स  प्ले स्टोअर वर उपलब्ध आहेत. पण ती वेगवेगळी ॲप डाउनलोड करून ते वापरणे सर्वच दृष्टीने गैरसोईचे होते.  या नवीन एकत्रित मायक्रोसॉफ्ट ॲप द्वारे  वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट ची कोणतीही फाईल ओपन किंवा एडिट करू शकतो , किंवा एखादी नवीन फाईल बनवून ती जतन करू शकतो.

मायक्रोसॉफ्टच्या या अधिकृत ॲपचे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे डब्ल्यू पी एस ऑफिस किंवा इतर ऑफिस सूट पेक्षा हे ॲप अधिक चांगले आणि अत्याधुनिक असे आहे. शिवाय हे ॲप ऍड फ्री आहे, म्हणजे कोणतीही जाहिरात यामध्ये दाखवली जात नाही, त्यामुळे काम करताना कोणताही अडथळा येत नाही .

मायक्रोसोफ्ट वर्ड डॉक्युमेंट, एक्सेल डॉक्युमेंट, पावर पॉइंट प्रेझेंटेशन एडिट करणे, नवीन ऑफिस डॉक्युमेंट फाईल बनवणे, एडिट करणे अशी अनेक कामे आपण या ॲपद्वारे सहज आणि सोप्या पद्धतीने करू करता येतात.

याशिवाय या ॲप मध्ये इतरही अनेक अत्याधुनिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. यातील अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत आहेत.

1) एखादा कागद स्कॅन करून त्यातील मजकूर थेट वर्ड फाइल स्वरुपात जतन करता येतो .

2) कागदावरील तक्ता स्कॅन करून तो थेट एक्सेल फाईल स्वरुपात जतन करणे.
      (गूगल लेन्स प्रमाणे)

 (टीप: वरील दोन्ही सुविधा फक्त इंग्रजी मजकूरसाठी वापरता येतात, मराठी मजकूरासाठी अजून या सुविधा उपलब्ध नाहीत)

 3) नोट्स सेव करणे

4) कॅम स्कॅनर प्रमाणे डॉक्युमेंट किंवा इतर कागदपत्रे स्कॅन करून ते इमेज पीडीएफ स्वरूपात सेव्ह करणे अथवा शेअर करणे .

5) शेअर इट प्रमाणे वाय-फाय द्वारे एकमेकांना फाईल शेअर करता येणे .

6)  पीडीएफ वर सही करणे.

7)  चित्रांपासून पीडीएफ फाईल बनवणे.

 8) वर्ड फाइल चे पीडीएफ फाईल मध्ये रूपांतर करणे.

 9) क्यू आर कोड स्कॅन करणे व त्यातील मजकूर सेव्ह करणे अथवा लिंक ओपन करणे .

10) मायक्रोसॉफ्ट च्या ऑफिस ट्रान्सफर या ऑनलाइन सुविधेद्वारे आपण कोणतीही डॉक्युमेंट  फाइल क्यूआर कोड स्वरुपात संगणक ते मोबाइल व मोबाइल ते संगणक अशी थेट पाठवू शकतो.

वरील सर्व सुविधांमुळे मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे नवीन वर्जन डब्ल्यू पी एस ऑफिस किंवा प्ले स्टोअरवर उपलब्ध असणारे इतर ऑफिस सूट यापेक्षा कितीतरी पटीने आधुनिक आणि सोयीचे बनले आहे.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे अधिकृत ॲप खालील लिंक वर क्लिक करून प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकता.

https://play.google.com/store/apps/details?id=com.microsoft.office.officehubrow

टेलिग्राम चॅनल
https://t.me/TechGuruMarathi


2 comments: