Sunday, March 8, 2020

ॲपचे वंडरलँड 5 : लाईव्ह ट्रान्सक्राइब

2 comments

व्हाईस टायपिंग(बोलून टाइप करणे) करण्यासाठी सर्वोत्तम ॲप...........

 

 एखादे पत्र, अर्ज किंवा एखादा लेख लिहिणे, डॉक्युमेंट तयार करणे,  फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, ट्वीटर  इत्यादी अनेक समाज माध्यमांवर पोस्ट टाकणे, मेल पाठवणे, ऑनलाइन माहिती सर्च करणे . अशा अनेक कारणांसाठी आपल्याला मोबाइल अथवा संगणकावर मजकूर टाइप करण्याची गरज भासते.  टायपिंग हा आजच्या डिजिटल युगातील एक महत्वाचा भाग बनलेला आहे.

बदलत्या काळासोबत तंत्रज्ञान आणखीनच प्रगत होत चालले आहे. आणि त्यासोबतच माणसाची काम करण्याची पद्धत ही आणखीन सोपी बनत चाललेली आहे.  टायपिंग सारखे कामही त्याला अपवाद राहिले नाही. टायपिंग करणे ही खूप सोपे झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानवर आधारित आपण बोललेला संपूर्ण मजकूर आपोआप टाइप करणारी अनेक ॲप्स प्ले स्टोअर वर उपलब्ध आहेत.

परंतु यापैकी बऱ्याच ॲप्समध्ये जाहिराती दिसतात आणि ॲप वापरताना आपल्याला अडचणी येतात. बोलून टाईप करताना अनेक चुका राहतात, कधीकधी टाईप होण्यासाठी वेळ लागतो.

या सर्वांमध्ये गूगल चे Live Transcribe हे व्हाईस टायपिंग करण्यासाठी सर्वोत्तम आहे. मूक बधिर व्यक्तींना समोरच्या व्यक्तीने बोललेले समजावे या उद्देशाने सुरूवातीला या ॲप ची निर्मिती करण्यात आली. असे असले तरी व्हाईस टायपिंग साठीही याचा चांगला वापर होतो.

हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर सुरुवातीला ते माईक वापरण्याची परवानगी मागते, काही मोबाइल मध्ये सेटिंग मधून Accesibility ची परवानगी ही चालू करावी लागते. आणि त्यानंतर ॲप चालू होते. ॲप चालू केल्यानंतर स्क्रीनच्या मध्यभागी माइक चे चित्र दिसते. स्क्रीनच्या खालच्या बाजूला जी भाषा दिलेली असते. त्यावर टच केल्यानंतर भाषांची यादी येते, या यादीमधून आपल्याला ज्या भाषेत व्हॉइस टायपिंग करायचे आहे ती भाषा आपण निवडू शकतो. अगदी मराठीचाही यामध्ये समावेश आहे. भाषा निवडल्यानंतर आपण बोललेला मजकूर किंवा सभोवताली चे संभाषण आपोआप स्क्रीनवर टाइप होऊ लागते.

संपूर्ण मजकूर टाइप झाल्यानंतर किंवा जो मजकूर आपल्याला टाईप करायचा आहे तो संपूर्ण बोलून टाईप झाल्यानंतर आपण त्या मजकुरावर लॉन्ग प्रेस करून त्यातील हवा तितका भाग निवडायचा आणि तो कॉफी करून हव्या त्या ठिकाणी आपण पेस्ट करू शकतो. जसे की आपण एखादे डॉक्युमेंट टाईप करत असाल तर डब्ल्यू पी एस ऑफिस किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये न्यू वर्ड डॉक्युमेंट निवडून ते ओपन करायचे आणि त्यात सुरुवातीला लॉंग प्रेस करून येणारे मेनू मधून पेस्ट वर क्लिक करायचे. आपण बोललेला मजकूर जो आपण Live Transcribe मध्ये कॉपी केलेला होता तो आपोआप वर्ड डॉक्युमेंट मध्ये पेस्ट होईल.

त्यात योग्य तो बदल व एडिटिंग करून अगदी काही क्षणांमध्ये आपण भलामोठा उतारा असलेला डॉक्युमेंट सहज टाईप करू शकतो. गुगलचे लाईव्ह ट्रान्सक्राईब हे एक वापरून आपण टायपिंग करताना होणारी मेहनत आणि वेळेची खूप कौशल्याने बचत ही करू शकतो. ॲपचे वंडरलँड या लेखमालेमार्फत आजपर्यंत जे चार लेख मी लिहिले आहेत ते सुद्धा याच लाइव्ह ट्रान्सक्राईब मध्ये बोलून टाइप केलेले आहेत.
हाच लेख हाताने टायपिंग करून घ्यायचा म्हटल्यास त्यासाठी माला खूपच अधिक वेळ लागला असता. पण व्हॉईस टायपिंग द्वारे हेच काम अगदी काही क्षणात पूर्ण होते आणि थोडावेळ एडिटिंग करून आपला संपूर्ण लेख आपला एखादा अर्ज किंवा व्हाट्सअप वरील एखादा मोठा मेसेज अगदी कमी वेळात तयार होतो.

गुगलच्या लाईव्ह ट्रान्सक्राईब शिवाय जी बोर्ड (G Board) नावाचे गुगलचे ॲप आहे ज्यामध्ये आपण हाताने लिहून, बोलून किंवा बोटांनी टाईप करून मराठी लिहू शकतो.  जी बोर्ड आणि लाईव्ह ट्रान्सक्राईब यामधील महत्त्वाचा फरक असा की  जी बोर्ड द्वारे मोठा मजकूर लिहिताना थोडीशी अडचण येते पण लाईव्ह ट्रान्सक्राईब मध्ये मात्र आपण कितीही मोठा मजकूर सहज लिहू शकतो. संपूर्ण मजकूर आपल्याला स्क्रीन वर पाहायला मिळतो. त्यातील हवा तो भाग आपण कॉपी करून हव्या त्या ठिकाणी पेस्ट करून तो मजकूर पाठवू शकतो. अथवा फाइल मध्ये सेव्ह करू शकतो.

व्हॉइस टायपिंग करणारे सर्व ॲप सध्यातरी ऑनलाईनच वापरावी लागतात. म्हणजे बोलून टाईप करताना आपल्या मोबाईल चे नेट कनेक्शन चालू असणे गरजेचे आहे .

जी बोर्ड हे ॲप छोटा संदेश बोलून टाईप करण्यासाठी सर्वोत्तम आहे. पण तर एखादा लेख, एखादा अर्ज किंवा एखादा मोठा संदेश टाईप करायचा असेल तर जी बोर्ड किंवा इतर व्हॉइस टायपिंग करणाऱ्या ॲप मधून हे काम करताना खूप अडचण येते. हेच काम लाईव्ह ट्रान्सक्राईब मध्ये खूप चांगल्या पद्धतीने करता येते. शिवाय हे ॲप गूगल ने निर्माण केलेलेअसल्यामुळे यामध्ये कोणत्याही जाहिराती दिसत नाहीत. तसेच इतर व्हॉइस टायपिंग ॲप्स च्या तुलनेत चुकाही अगदी नगण्य होतात.

लाईव्ह ट्रान्सक्राईब हे ॲप आपण खालील लिंक वर क्लिक करून प्ले स्टोर वरून डाऊनलोड करू शकता
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.audio.hearing.visualization.accessibility.scribe

टेलिग्राम चॅनल:
https://t.me/TechGuruMarathi

2 comments: