Sunday, March 1, 2020

ॲपचे वंडरलँड भाग 4 : टेलीग्राम

0 comments
टेलिग्राम मेसेंजर व्हाट्स ॲप पेक्षा सरस का आहे......?


व्हाट्सअप वापरण्यासाठी अनेक बाबतीत त्रासदायक ठरते, आपल्या सर्वांच्या व्हाट्सअप  वर दररोज  हजारो मेसेजेस येतात ,त्यात आपण जॉइन असणारे शेकडो ग्रुप असतात. या शेकडो ग्रुप वर येणार्‍या हजारो मेसेज मध्ये आपल्याला हवा तो मेसेज/हवी ती माहिती शोधताना आपली खूप दमछाक होते.
फोन ची मेमरी रिकामी करण्यासाठी मेसेज वारंवार डिलिट करावे लागतात, किंवा चुकून महत्वाचा मेसेज डिलिट होतो आणि तो परत मिळवता येत नाही.
खूप दिवसांपूर्वी पाठवलेली एखादी पीडीएफ, इमेज किंवा फाइल डाउनलोड होत नाही.
व्हिडिओ पाठवताना साइज ची मर्यादा येते.
अशा अनेक गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरतात.

 टेलिग्राम या मेसेंजर ॲप मध्ये अशी अनेक उत्तम वैशिष्ठ्ये आहे जी की व्हाट्सअप मध्ये अजिबात नाहीत ज्यामुळे आपल्याला व्हाट्सॲप वापरताना अनेकदा मनस्ताप होतो, त्रास होतो आणि सोबत आपला बहुमूल्य वेळही वाया जातो. टेलिग्राम या मेसेंजर ॲप मधील अशाच काही हटके वैशिष्ट्यांची माहिती आज या लेखामध्ये आपण घेणार आहोत.मला विश्वास आहे की ही सर्व वैशिष्ठ्ये वाचल्यानंतर तुम्ही व्हाट्सॲप वापरणे बंद कराल. जरी तुम्हाला टेलिग्राम विषयी माहिती असेल आणि याआधी तुम्ही हे ॲप वापरले असेल, तरीही  या ॲप ची अनेक हटके फीचर्स या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत जी तुमच्यासाठी नवीन व खूपच उपयुक्त असतील.

टेलिग्राम मध्ये अशी अनेक फीचर्स जी आपल्या वेळेची बचत करतात व आपला त्रास कमी करतात यातील काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांविषयी आज आपण माहिती घेऊ.

यातील पहिले आणि महत्त्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे टेलीग्राम हे क्लाऊड बेस्ट मेसेजिंग सर्विस असणारे मेसेजिंग ॲप आहे. म्हणजेच यातून पाठवलेले आणि प्राप्त होणारे मेसेज हे आपल्या मोबाईल वर जतन न होता ते क्लाऊड म्हणजेच टेलिग्राम च्या सर्वर वर जतन होतात. त्यामुळे एकतर आपल्याला ते वारंवार डिलीट करायची गरज लागत नाही किंवा एखाद्या वेळी महत्वाचा मेसेज डिलिट केला तरी तो आपल्याला ॲप चालू केल्यानंतर परत दिसतो. अगदी सुरुवातीपासूनचे मेसेज आपल्याला केंव्हाही पाहता येतात.याचा फायदा असा होतो की आपल्याला वारंवार मेसेज डिलीट करावे लागत नाही किंवा चुकून डिलीट झालेले मेसेज की आपल्याला सहज परत पाहता येतात

मेसेज एडिट व डिलिट : टेलिग्राम मार्फत पाठवलेला मेसेज आपण केव्हाही एडिट करू शकतो अर्थातच बदलू शकतो आपण मेसेज पाठवल्या नंतर आपल्याला असे जाणवले की तो थोडासा चुकलेला आहे, त्यावेळी आपण त्यावर लॉन्ग प्रेस करून एडिट करू शकतो. किंवा त्यामध्ये बदल करू शकतो झालेला बदल ज्यांना आपण मेसेज पाठवलेला आहे त्यांच्या मोबाईलवर तो दिसतो. त्याचबरोबर एखादा चुकून पाठवला गेलेला मेसेज जर आपल्याला डिलीट करायचा असेल तर तोही आपण सहजपणे डिलीट करू शकतो. आपण तो पाठवला होता हे समोरच्यांना कळणारही नाही. व्हाट्सअप सारखे 'डिलीटेड मेसेज' असा रिकामा मेसेज त्या ठिकाणी  दिसणार नाही आणि मेसेज डिलीट करण्यासाठी कोणतेही वेळेचे बंधन नाही. पाठवलेला मेसेज केंव्हाही डिलीट करता येतो. आपण मेसेज डिलीट करू त्यावेळी तो इतर सर्वांच्या मोबाईल मधूनही आपोआप डिलीट होईल.

सुरक्षा : टेलिग्राम वरील आपला नंबर इतरांशी शेअर करण्याची गरज लागत नाही. म्हणजे आपण एखाद्या ग्रुप वर किंवा चैनल वर किंवा एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवतो तेव्हा त्यांना आपला फोन नंबर दिसत नाही त्या ठिकाणी फक्त आपले टेलिग्राम युजरनेम दिसते. त्यामुळे वैयक्तिक सुरक्षेसाठी सुद्धा हे ॲप व्हाट्सअप पेक्षा कितीतरी पट चांगले आहे.

ड्राफ्ट मॅसेज हे आणखीन एक वेगळे वैशिष्ट्य टेलिग्राम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आपण एखादा मेसेज टाईप करताना अचानक काही कामानिमित्त ॲप बंद करावे लागले तर तो आपोआप जतन होतो. दुसऱ्यांदा ॲप आपण ओपन केल्यानंतर त्याच्या सर्वात वरील भागात अर्धवट राहिलेला मेसेज सुरुवातीला दिसेल तो आपण पूर्ण करून पाठवू शकतो.

टेलिग्राम ग्रुप : व्हाट्सअप वर एका ग्रुप मध्ये जास्तीत जास्त 256 ग्रुप सदस्य अॅड करता येतात. टेलिग्राम ॲप वर हीच मर्यादा 2 लाख आहे. म्हणजेच एका ग्रुप मध्ये 2 लाखापर्यंत सदस्य असू शकतात. ग्रुप च्या लिंक द्वारे अनेक सदस्य यात सहभागी होऊ शकतात. लिंक चे नावही आपण आपल्या सोयीनुसार बदलू शकतो. टेलिग्राम ॲप च्या ग्रुप ची लिंक खालील प्रमाणे दिसते.
https://t.me/GurumitraApp
ग्रुप च्या लिंक वर क्लिक केल्यास आपल्याला ग्रुप वरील संपूर्ण मेसेज पाहता येतात. खालील जॉइन बटन क्लिक केल्यास आपण ग्रुप चे सदस्य होता येते, त्यानंतरच आपल्याला संबंधित ग्रुप वर मेसेज पाठवता येतात. ग्रुप सदस्य संख्येची मर्यादा जास्त असल्यामुळे ग्रुप ची संख्याही वाढत नाही.

फाईल मर्यादा : व्हाट्सअप वर एखादी फाईल पाठवण्यासाठी ती फाईल 160 मेगाबाइट पेक्षा लहान असावी व व्हिडिओची मर्यादाही 16 मेगाबाइट आहे पण हीच मर्यादा टेलिग्राम मध्ये मात्र 1.5 GB पर्यंत आहे. त्यामुळे आपण मोठे व्हिडिओ किंवा इतर जास्त साइज असणार्‍या फाइल ही टेलिग्राम मार्फत पाठवू शकतो.

दोन टेलिग्राम अकाउंट: एकाच ॲप मध्ये वेगेवेगळे फोन नंबर वापरुन दोन वेगवेगळे  टेलिग्राम अकाऊंट काढता येतात हे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य आहे जे व्हाट्सअप मध्ये आपल्याला मिळत नाही.

 टेलिग्राम चॅनल: हे एक वेगळे वैशिष्ट्य आपल्याला टेलीग्राम वर पाहायला मिळेल जे की व्हाट्सअप वर उपलब्ध नाही. आपण व्हाट्सअप वर जशी ब्रॉडकास्ट लिस्ट बनवतो तसाच हा प्रकार आहे. फरक फक्त एवढाच आहे की हे चॅनल बनवल्यानंतर समोरच्या व्यक्तीला या चॅनल ला सबस्क्राईब करावे लागते. पहिले दोनशे सदस्य आपण या मध्ये स्वतः ऍड करू शकतो यानंतर आपण चॅनेलची लिंक शेअर करून या लिंक मार्फत आपल्या उर्वरित सदस्य चॅनलला जॉईन करू शकतात. टेलिग्राम ग्रुप प्रमाणे टेलिग्राम चॅनल वर ही लाखो सदस्य जॉइन होऊ शकतात.

टेलिग्राम चॅनलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पब्लिक टेलिग्राम चॅनल टेलिग्राम सर्च मधून शोधता येतात. म्हणजेच, टेलिग्राम वर जगभरात उपलब्ध असणारे चॅनल ॲप मधील सर्च बार मधून सर्च करता येतात. आणि त्यातील आपल्याला हवे ते चॅनल आपण जॉइन करू शकतो. असे फीचर व्हाट्सॲप वर उपलब्ध नाही.

टेलिग्राम बॉट : टेलिग्राम वर अनेक बॉट उपलब्ध आहेत, यांचा वापर करून आपण आपले चॅट आणखी सोयिस्कर बनवू शकतो. जसे की Quiz Bot, याचा वापर करून आपण एखादी प्रश्नमंजुषा घेऊ शकतो. टी साठी व्हाट्सॲप प्रमाणे स्वतंत्र गूगल फॉर्म बनवण्याची गरज नाही. प्रश्न ग्रुप वरच दिसतात व त्याचा निकालही काढता येतो.

वरील सर्व वैशिष्ट्यांशिवाय स्वतंत्र ग्रुप अथवा व्यक्तीची नोटिफिकेशन म्यूट करता येणे, थीम बदलता येणे यासारखी इतरही अनेक सुविधा या ॲप मध्ये आहेत.
वरील सर्व सुविधांमुळे टेलिग्राम ॲप व्हाट्सअप पेक्षा कितीतरी अधिक सरस ठरते.

खालील लिंक वर क्लिक करून टेलिग्राम ॲप डाऊनलोड करू शकता..
https://play.google.com/store/apps/details?id=org.telegram.messenger

टेलिग्राम चॅनल :  https://t.me/TechGuruMarathi

No comments:

Post a Comment