Sunday, March 15, 2020

ॲप चे वंडरलँड 6: मायक्रोसॉफ्ट मॅथ

3 comments

गणिताच्या सरावासाठी सर्वोत्तम शैक्षणिक ॲप....


नवनवीन अँड्रॉइड ॲप ची ओळख करून देणाऱ्या ॲप चे वंडरलँड  लेख मालिकेच्या या भागांमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट मॅथ  (Microsoft Math) या गणित विषय शैक्षणिक अँड्रॉइड ॲप्लिकेशन ची ओळख करून घेणार आहोत.
नावाप्रमाणेच हे मायक्रोसॉफ्टने बनवलेले गणित विषय शैक्षणिक ॲप्लिकेशन आहे. हे शैक्षणिक ॲप्लिकेशन
इयत्ता पहिलीपासून ते गणिताच्या पदवी अभ्यासक्रमात पर्यंत शिकणार्‍या कोणत्याही विद्यार्थ्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहे.

गणितातील एखादे उदाहरण सोडवताना अडचण येत असेल, ते कसे सोडवले हे समजत नसेल तर संबंधित प्रश्न या अॅप्लिकेशन च्या मदतीने स्कॅन करून अथवा टाइप करून सोडवता येतो. प्रश्न स्कॅन केल्यानंतर त्यापुढील बाण रूपी विमानाच्या चिन्हावर क्लिक केल्यावर दिलेल्या गणिताचे उत्तर पायरी पायरीने व मराठीतून, योग्य त्या स्पष्टीकरणसह आपल्याला सोडवून मिळते. त्यामुळे गणितातील संकल्पना चांगल्या पद्धतीने समजतात. अंकगणित, बीजगणित, विविध समीकरणे, भौमितिक समीकरणे या अॅप्लिकेशन च्या सहाय्याने सहज सोडवता येतात. भौमितिक समीकरणे सोडवण्या बरोबरच त्याचे आलेखही या ॲपमध्ये दाखवली जातात. 

हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर सुरूवातीला ते भाषा निवडण्यासाठी सांगते. स्क्रीनवर यादीमध्ये इंग्रजी भाषा दिसते. त्याखाली Other Languages अशी लिंक दिसते. यावर क्लिक केल्यानंतर येणार्‍या यादीतून  आपण आपल्या सोयीची भाषा निवडू शकतो. यामध्ये मराठीचाही समावेश आहे. मराठी भाषा निवडल्यानंतर अॅप्लिकेशन ची थोडक्यातओळख करून देणारी स्क्रीन मालिका आपल्यासमोर येते. ही स्क्रीन मालिका आपण पाहू शकता किंवा वरील उजव्या कोपर्‍यात असलेल्या Skip या बटनावर क्लिक करून थेट ऍप सुरू करू शकता. ऍप सुरू केल्यानंतर पाठीमागे कॅमेरा सुरू होतो आणि समोर एक सूचना बॉक्स येतो. यात काही नमूना उदाहरणाचे फोटो येतात.  त्यातील जो फोटो आपण निवडू त्या फोटोतील गणित स्कॅन होऊन त्याचे अंकांमध्ये किंवा समीकरणांमध्ये रूपांतर होते. उदाहरण ऑनलाइन स्कॅन झाल्यानंतर समोरील एरोप्लेन रूपात असलेल्या अॅरो बटणावर क्लिक करा. उदाहरण पायरी पायरीने कसे सोडवले याची सविस्तर माहिती आपल्याला स्पष्टीकरणसह मराठीतून मिळेल .
आपण स्वतः लिहिलेली वही वरील, पुस्तकातील उदाहरणे ही स्कॅन करून घेऊ शकतो . स्कॅन करताना मात्र आपल्या मोबाईल मधील इंटरनेट कनेक्शन चालू असणे गरजेचे आहे. पुस्तकातील वहीवर लिहिलेली गणिते सोडवण्याबरोबरच हे अॅप्लिकेशन वापरुन आणखी दोन पद्धतीने हे गणिते सोडवू शकतो. पहिला पर्याय म्हणजे यामध्ये हाताने गणित लिहून स्कॅन करता येते(गूगल हँड रायटिंग प्रमाणे)आणि दूसरा पर्याय म्हणजे टाईप करून ही गणिते सोडवू शकतो. यासाठी ॲप मध्ये खास या ॲप साठी बनवलेला गणिताचा की बोर्ड आहे. त्यामध्ये सर्व गणिताची चिन्ह व अंक टाइप करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. ती वापरून आपण गणिताचे उदाहरण टाइप करू शकतो. टाईप केल्यानंतर ते ऑनलाईन स्कॅन होते. स्कॅन झाल्याबरोबर उदाहरणसमोरील एयरप्लेन बटन कार्यरत होते. त्यावर क्लिक केल्यास उदाहरणाचे सविस्तर उत्तर आपणास स्क्रीनवर दिसते.

पुस्तकातील अथवा वही वरील गणिते स्कॅन करून सोडणारी इतरही अनेक ॲप्स प्ले स्टोअर उपलब्ध आहेत. या सर्वांमध्ये फोटोमॅथ  हे ॲप चांगले आहे. पण या ॲप मध्येही काही मर्यादा येतात. हाताने लिहिलेली गणिते स्कॅन करण्यासाठी त्यामध्ये पेड वर्जन विकत घ्यावे लागते. पण मायक्रोसॉफ्ट मॅथ मध्ये मात्र या सर्व सुविधा मोफत दिलेल्या आहेत. त्याच बरोबर फोटोमॅथ पेक्षा आणखीन एक सरस सुविधा मायक्रोसॉफ्ट मॅथ मध्ये आहे, ती सुविधा म्हणजे भाषेची निवड, आपण मराठी भाषेमध्ये उदाहरणाचे स्पष्टीकरण मिळवू शकतो.

वरील सर्व वैशिष्ट्यांव्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट मॅथ वापरताना काही मर्यादाही येतात. जसे की एखादे गणित जर शाब्दिक उदाहरण स्वरुपात असेल तर अशी शाब्दिक उदाहरणे मायक्रोसॉफ्ट मॅथ स्कॅन करून सोडवू शकत नाही.

याशिवाय मायक्रोसॉफ्ट मॅथ वापरण्यासाठी इंटरनेट कनेक्शन चालू असणे गरजेचे आहे. या सर्व मर्यादा असूनही मायक्रोसॉफ्ट मॅथ हे या प्रकारातील सर्वात उपयुक्त असे ॲप्लिकेशन आहे, मायक्रोसॉफ्ट मॅथ हे ॲप खाली दिलेल्या प्ले स्टोर लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता....

https://play.google.com/store/apps/details?id=com.microsoft.math

 टेलिग्राम चॅनल:
https://t.me/TechGuruMarathi

3 comments: