Sunday, February 9, 2020

ॲप्स चे वंडरलँड : 1. गूगल लेन्स

0 comments

नमस्कार मित्रांनो,
 ॲप्स चे वंडरलँड या सदरातील पहिल्यावहिल्या लेखामध्ये आपले स्वागत आहे ......
माहिती तंत्रज्ञान प्रकाशाच्या वेगाने बदलत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा यांसारख्या नवनवीन शाखा हा वेग आणखीनच गतिमान करीत आहेत. आणि या बदलणार्‍या तंत्रज्ञानबरोबर काम करण्याची पद्धतही बदलत आहे.  हळूहळू हार्ड वर्क चे रूपांतर स्मार्ट वर्क मध्ये  होत आहे. पूर्वी जे काम फक्त मनुष्यच करू शकत असे, अशी अनेक कामे आज संगणक करतोय. संगणक माणसांप्रमाणे विचार करायला शिकत आहे. सध्या तर तो माणसाची भाषा ओळखायलाही शिकलाय. बोललेला, लिहिलेला मजकूर तो सहज ओळखू शकतो. त्याचे शब्दात रूपांतरही करू शकतो. आणि हे सर्व शक्य झाले आहे ते गूगल च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानने...

   गूगल लेन्स  हे गूगल चे ॲप  याच तंत्रज्ञानवर आधारित  आहे. हे ॲप कसे काम करते याची थोडक्यात ओळख आपण आजच्या या लेखामध्ये करून घेणार आहोत.


मित्रांनो आपल्याला अनेक वेळा एखाद्या इमेज मधील पीडीएफ मधील किंवा छापील मजकूर बघून परत एकदा टाईप करावा लागतो परंतु गुगल लेन्स या ॲपचा वापर करून आपण जर एखाद्या छापील मजकूर तो मग पीडीएफ मध्ये असेल, एखाद्या इमेज मध्ये असेल, किंवा छापील पुस्तकातील असेल त्याचे टेक्स्ट स्वरूपात एका क्षणात रूपांतर करू शकतो. त्यासाठी आपल्याला तो मजकूर पाहून परत टाईप करत बसण्याची मेहनत घ्यावी लागणार नाही . आहे ना स्मार्ट वर्क...?

पण हे स्मार्ट वर्क कसे करायचे....?

तर यासाठी गूगल लेन्स ॲप  प्ले स्टोर वरून डाऊनलोड करायचे आहे. ॲप चालू करून जो मजकूर आपल्याला टाईप करायचा आहे तो जर एखाद्या पुस्तकातील असेल किंवा एखाद्या चित्रातील असेल तर त्या पुस्तकावर किंवा चित्रावर आपल्याला मोबाईल धरायचा आणि गुगल लेन्स हे ॲप चालू करायचे.

ॲप सुरू होताच त्यातील कॅमेरा आपोआप चालू होईल आणि तो त्या चित्रातील किंवा पुस्तकातील मजकूर स्कॅन करून त्याचे टेक्स्ट मध्ये रूपांतर करेल हाच रूपांतरित केलेला मजकूर आपण कॉपी करून इतरत्र कुठेही पेस्ट करू शकतो किंवा एखादी टेक्स्ट अथवा वर्ड डॉक्युमेंट फाईल बनवू शकतो व तो सेव करू शकतो.

याशिवाय जर एखादी पीडीएफ असेल. व त्यातील मजकूर कॉपी करायचाअसेल तर फक्त एकेका पानाच्या स्क्रीनशॉट घ्यायच्या, गूगल लेन्स ॲप चालू करायचे, कॅमेरा चालू होईल व वरील उजव्या कोपर्‍यात गॅलरी चालू करायचे बटन दिसेल त्यातून मजकूर असलेली इमेज फाइल उघडायची. त्यातील हवा तो मजकूर सलेक्ट करून कॉपी करायचा. तुमचा मजकूर इतरत्र पेस्ट करायला तयार आहे, आता तो तुम्ही कोठेही जसे की व्हाट्सॲप अथवा वर्ड फाइल मध्ये पेस्ट करू शकता. विशेष बाब अशी की आपण अगदी मराठी मजकूरही कॉपी करू शकतो.
अशा पद्धतीने आपण गूगल लेन्सच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ने बनलेल्या ऑनलाइन प्रणालीच्या मदतीने कोणताही मजकूर स्कॅन करून त्याचे टेक्स्ट मध्ये रूपांतर करू शकतो हे ॲप खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही डाऊनलोड करू शकता .

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.ar.lens 

अपडेट - २०२२ पासून गूगल लेन्स ची सुविधा आपल्या मोबाईल मधील गुगल ऍप मध्ये सर्च बार च्या शेवटी दिली आहे. त्यामुळे नवीन अँड्रॉइड मोबाईल मध्ये वेगळे गूगल लेन्स ऍप डाउनलोड न करताही ही  सुविधा आपण गूगल ऍप मधून वापरू शकतो.


आमचे टेलिग्राम चॅनल -  https://t.me/TechGuruMarathi


No comments:

Post a Comment