Friday, February 19, 2016

अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा.

8 comments


स्क्रीन मिरर करण्यासाठी खालील सूचना नुसार कृती करा.
१. आपल्या मोबाईल वर एअरड्रॉइड (Airdroid) हे अॅप इन्स्टॉल करा.(प्ले स्टोर वर उपलब्ध आहे.)

२. हे अॅप आपण संगणकाला  ला वाय फाय  किंवा यु यस बी टीदरिंग अशा दोन प्रकारे कनेक्ट करू शकतो, त्यामुळे डेस्कटॉप कॉम्पुटर वरही स्क्रीन मिरर करता येते.

३. airdroid  अॅप मोबाईल वर इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा व त्यातील tethering ऑप्शन वर क्लिक करायु एस बी किंवा वाय-फाय  यापैकी जो आपल्याला योग्य आहे तो चालू  करा.

४. अॅप संगणकाला कनेक्ट झाल्यानंतर अँप वर 
http://192.168.43.1:8888/
193.168.42.129:8888
अशा प्रकारचा  IP ऍड्रेस दिसेल, तुमच्या बाबतीत या ऍड्रेस मधील अंक वेगळे असू शकतात. तुमच्या अॅप  मध्ये दिसणारा ऍड्रेस कॉम्पुटर च्या वेब ब्राऊजर मध्ये टाका, मोबाइल वर संगणकाशी जोडण्याची अनुमती मागणारा बॉक्स येईल तो एक्सेप्ट करा.

५. आता तुम्ही मोबाइल वेबसाईट स्वरूपात तुम्ही कॉम्पुटर च्या ब्राऊजर मधून नियंत्रित करू शकता.

६. स्क्रीन मिररिंग  साठी ब्राऊजर मधील वेब इंटरफेस मधील स्क्रीनशॉट वर क्लिक करा, तुमचे स्क्रीन मिररिंग  चालू होईल.

७. याशिवाय एअरड्रॉइड  अॅप  वापरून मोबईल मधून फाईल ट्रान्सफर, संगणकातून कॅमेरा कंट्रोल, कॉल,एस एम एस , कॉन्टॅक्ट असे अनेक पर्याय  आपण संगणक/लॅपटॉप वर वापरू शकतो..

८. हे अॅप वापरून आपण मोबाईल ते संगणक  संगणक ते मोबईल असा  कन्टेन्ट कॉपी पेस्ट करू शकतो यासाठी यात मोबाईल चा क्लिपबोर्ड वापरण्याचीही सुविधा दिला आहे. पण ही सुविधा फक्त अँड्रॉइड च्या नवीन व्हर्जन मध्ये चालत नाही.

१०.हे अॅप ऑफलाईन चालते, संगणका वर कोणतेही सॉफ्टवेअर  इन्स्टॉल करण्याची गरज नाही, ब्राऊजर मध्ये इंटरफेस चालतो. हे अॅप प्ले स्टोर वर मोफत उपलब्ध आहे.

हे ऍप वापरून मोबाईल व संगणक  आपण सहजपणे यु एस बी केबल शिवाय एकमेकांना जोडू शकतो.

8 comments: