Sunday, October 4, 2015

संगणकावर वापरा अँड्रॉइड ऍप्स

3 comments
संगणकावर मिळणाऱ्या सॉफ्टवेअर  पेक्षा अँड्रॉइड ऍप हे वैविध्यपूर्ण आणि कमी साइझ घेतात,
अनेक वेळा हे ऍप  मोठ्या पडद्यावर वापर व्हावा म्हणून किंवा इतर कारणांसाठी संगणकावर वापरावयाची गरज पडते, यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ब्लुस्टॅक्स (bluestacks) हे सॉफ्टवेअर  होय.
      हे सॉफ्टवेअर  वापरासाठी अत्यंत सोपे आहे. एकदा इंस्टाल झाल्यानंतर कोणत्याही apk फाईल  वर डबल क्लिक केल्यानंतर ती ब्लुस्टॅक्स मध्ये इंस्टाल होते. व संगणकावर हे ऍप  वापरता येते.

हे सॉफ्टवेअर  डाउनलोड करण्यासाठी प्रथम www.bluestacks.com या वेबसाईट  वर जा.

download for pc या वर क्लिक करा.१४ एम.बी. ची फाईल  डाउनलोड होईल.

डाउनलोड झालेल्या फाईल  वर डबल क्लिक करून इंस्टाल करा.

ब्लुस्टॅक्स हे सॉफ्टवेअर  इंस्टाल होईल.

इंस्टाल झाल्यानंतर हे सॉफ्टवेअर  चालू करा. यावेळी तुमच्या संगणकावर  वर इंटरनेट  चालू पाहिजे. bluestacks साठी आवश्यक डेटा डाउनलोड होईल.  इंटरनेट चा वेग  असेल तर हा डेटा  टप्प्या टप्प्या ने डाउनलोड होतो. संगणक  बंद केला तरी डाउनलोड खंडित होत नाही. परत संगणक  चालू केल्यास राहिलेला डेटा  डाउनलोड होतो.

संपूर्ण bluestacks इंस्टाल झाल्यानंतर तुम्ही यात ऍप  इंस्टाल अथवा डाउनलोड करू शकता. यात प्ले स्टोर  ची सुविधाही आहे

(टीप - ब्लुस्टॅक्स साठी संगणकामध्ये ग्राफिक्स कार्ड व साधारणतः १ जी. बी. पेक्षा जास्त रॅम  आवश्यक आहे.
डाउनलोड करण्यापूर्वी तुमच्या संगणकाचे हार्डवेअर  तपासा.)

ब्लुस्टॅक्स चे ऑफलाईन इंस्टॉलर  ही   www.bluestacks.com  वेबसाइट वर उपलब्ध आहे. 

3 comments:

  1. https://goo.gl/Tk6e7S ओळख विश्वाची - सूर्यमाला, सूर्यमालेतील सर्व ग्रह, तारे आणि इतर काही गोष्टींची माहिती मराठी मध्ये आहे. सर्व वयोगटातील मराठी व्यक्तींना विचारात घेऊन ओळख विश्वाची हे अप्लिकेशन बनवण्यात आले आहे.

    ReplyDelete
  2. Try this new app Popcorn Time Apk : which is maximum trending now.

    ReplyDelete