Saturday, May 23, 2015

संगणकावर मराठी टायपिंग कसे करावे? Best Marathi Typing Softwares for Windows 2020

7 comments
विंडोज च्या संगणकावर मराठीमध्ये टायपिंग करण्यासाठी यापूर्वी गुगल इंडिक इनपुट हे सॉफ्टवेअर गूगल ने मोफत उपलब्ध करून दिले होते. गुगल इंडिक इनपुट टुल विंडोज मध्ये युनिकोड मराठी टायपिंग साठी खूप प्रसिद्ध होते. पण काही कारणांमुळे गूगल ने या सॉफ्टवेअर चा सपोर्ट पूर्णपणे बंद केला आहे. आता हे सॉफ्टवेअर गूगल च्या साईट वर अधिकृतरीत्या डाउनलोड साठी उपलब्ध नाही. त्यामुळे संगणकावर युनिकोड मराठी टायपिंगसाठी इतर पर्यायांचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे. 

1. मायक्रोसॉफ्ट चे इंडिक इनपुट टुल :


 होय,मायक्रोसॉफ्ट चे स्वतः चे मराठी टायपिंग सॉफ्टवेअर ही उपलब्ध आहे.आणि हे सॉफ्टवेअर अगदी गुगल इनपुट टुल प्रमाणे वापरता येते. दोन्ही टुल च्या वापरामध्ये बरेच साम्य आहे. बर्‍याच वेळा टायपिंग करताना तर तुम्हाला समजणारही नाही की आपण मायक्रोसॉफ्ट चे टुल वापरतोय गुगल चे नाही. फरक फक्त एवढाच आहे की काही जोडाक्षरे आपल्याला हवी तशी टाइप करण्यासाठी आपण गुगल च्या सॉफ्टवेअर मध्ये व्हर्च्युअल की बोर्ड वापरायचो, पण येथे मात्र आपल्याला मायक्रोसॉफ्ट च्या अॅक्ससरीज मधील Character Map वापरुन हवे ते जोडाक्षर कॉपी पेस्ट करावे लागते. पण असा प्रसंग क्वचितच येतो. कितीही किचकट इंग्रजी जोडशब्द मराठीत टाकायचा असू दे. त्याचे स्पेलिंग टाइप केले की मराठी शब्द आपोआप टाइप होतो. याशिवाय हे सॉफ्टवेअर दिवसेंदिवस अधिकच सुलभ होत चालले आहे. त्यामुळे टाइप करताना कोणतीही अडचण येत नाही.

मायक्रोसॉफ्ट चे मराठी इंडिक टुल तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

https://www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads.aspx



2. सीडॅक चे ISM :

पुणेस्थित CDAC या शासकीय तंत्रज्ञान विषयक संस्थेने बनवलेले ISM हे भारतीय भाषांमध्ये टायपिंग करण्याचे सॉफ्टवेअर ही वापरण्यासाठी चांगले आहे. यात वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये युनिकोड टायपिंग करता येते. यात मराठीचाही समावेश आहे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे आपल्या सोईप्रमाणे की बोर्ड रचना निवडता येते, याचा फायदा ज्यांना जुन्या पद्धतीने टायपिंग करण्याची सवय आहे त्यांना जुना की बोर्ड निवडता येतो. जसे टाईपरायटर, फोनेटिक्स किंवा बायलिंग्वल त्यामुळे जुन्या फॉन्ट ची सवय असली तरीही युनिकोड मध्ये सहज मराठी टाइप करता येते.

अधिकृत डाऊनलोड लिंक :

3. जुने गुगल इनपुट टुल:

गुगल ने या सॉफ्टवेअर चा सपोर्ट बंद केला आहे तसेच त्यांच्या साईट वर हे सॉफ्टवेअर डाउनलोड साठीही उपलब्ध नाही . पण काही ऑनलाइन डाउनलोड साईट वर याचे ऑफलाइन इंस्टॉलर zip फाइल च्या स्वरूपत उपलब्ध आहेत. अशीच एक zip फाइल खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता.

फाइल डाऊनलोड करा

आमचे टेलिग्राम चॅनल -> https://t.me/TechGuruMarathi


7 comments:

  1. Thanks for sharing the new information with the world. Though I have completed M.S. software engineering, i am unable to share my knowledge with the world people.The main reason for this is because of my tight work schedule in my buy research papers online website company,i am unable to write, share or develop my knowledge in all terms both in technical and general knowledge i have been lagging behind. This will be a great boost up for me to revive my technical knowledge.

    ReplyDelete
  2. नमस्कार, छान आहे.

    ReplyDelete
  3. फारच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  4. मजा आली सर
    खूपच छान मोठं टेन्शन दूर केलात

    ReplyDelete