शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

अँड्रॉइड मोबाईल ची स्क्रीन लॅपटॉप/ डेस्कटॉप वर मिरर(प्रोजेक्ट) करा.स्क्रीन मिरर करण्यासाठी खालील सूचना नुसार कृती करा.
१. आपल्या मोबाईल वर airdroid हे app इन्स्टॉल करा.(play store वर उपलब्ध आहे.)

२. हे अॅप आपण संगणकाला  ला वाय फाय  किंवा यु यस बी टीदरिंग अशा दोन प्रकारे कनेक्ट करू शकतो, त्यामुळे डेस्कटॉप कॉम्पुटर वरही स्क्रीन mirror करता येते.

३. airdroid  अॅप मोबाईल वर इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा व त्यातील tethering ऑप्शन वर क्लिक करा, usb किंवा wifi यापैकी जो आपल्याला योग्य आहे तो enable करा.

४. अॅप संगणकाला कनेक्ट झाल्यानंतर अँप वर
193.168.42.129:8888
असा IP ऍड्रेस दिसेल तो कॉम्पुटर च्या वेब ब्राऊजर मध्ये टाका, मोबाइल वर एक permission बॉक्स येईल तो accept करा.

५. आता तुम्ही मोबाइल website स्वरूपात तुम्ही कॉम्पुटर च्या browser मधून कंट्रोल करू शकता.

६. स्क्रीन mirroring साठी browser मधील वेब इंटरफेस मधील स्क्रीनशॉट वर क्लिक करा, तुमचे स्क्रीन mirroring चालू होईल( या ऑप्शन साठी मोबाइलला root access हवा).

७. याशिवाय AIRDROID  अॅप  वापरून मोबईल मधून data ट्रान्सफर, कॅमेरा कंट्रोल, कॉल, sms , कॉन्टॅक्ट असे अनेक ऑप्शन्स आपण संगणक/laptop वर वापरू शकतो..

८. हे अॅप वापरून आपण मोबाईल ते संगणक  संगणक ते मोबईल असा  कन्टेन्ट कॉपी पेस्ट करू शकतो यासाठी यात क्लिपबोर्ड exchange इंटरफेस हि दिला आहे.

 ९. आपला मोबाईल रूट करण्यासाठी how to root  व तुमचा मोबाईल मॉडेल नाव टाकून गूगल वर search करा.
सर्व टप्पे अचूक पार पाडले तर रूट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.

१०.हे अॅप ऑफलाईन चालते, संगणका वर कोणतेही software  इन्स्टॉल करण्याची गरज नाही, browser मध्ये इंटरफेस चालतो. हे अॅप play store वर मोफत उपलब्ध आहे.

Enjoy screen mirroring........!

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

संगणकावर वापरा Android apps

संगणकावर मिळणाऱ्या softwares पेक्षा android apps हे हे वैविध्यपूर्ण आणि कमी साइझ घेतात,
अनेक वेळा हे apps मोठ्या पडद्यावर वापर व्हावा म्हणून किंवा इतर कारणांसाठी संगणकावर वापरावयाची गरज पडते, यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे bluestacks हे software होय.
      हे software वापरासाठी अत्यंत सोपे आहे. एकदा इंस्टाल झाल्यानंतर कोणत्याही apk file वर डबल क्लिक केल्यानंतर ती bluestacks मध्ये इंस्टाल होते. व संगणकावर हे app वापरता येते.

हे software डाउनलोड करण्यासाठी प्रथम www.bluestacks.com या website वर जा.

download for pc या वर क्लिक करा.१४ mb चे installer डाउनलोड होईल.

डाउनलोड झालेल्या file वर डबल क्लिक करून इंस्टाल करा.

bluestacks हे software इंस्टाल होईल.

इंस्टाल झाल्यानंतर हे software चालू करा. यावेळी तुमच्या pc वर net चालू पाहिजे. bluestacks साठी आवश्यक data डाउनलोड होईल. हा data साधारणतः ३०० ते ४०० mb च्या आसपास आहे . net जोडणी slow असेल तर हा data टप्प्या टप्प्या ने डाउनलोड होतो. pc बंद केला तरी डाउनलोड खंडित होत नाही. परत pc चालू केल्यास राहिलेला data डाउनलोड होतो.

संपूर्ण bluestacks इंस्टाल झाल्यानंतर तुम्ही यात app इंस्टाल अथवा डाउनलोड करू शकता. यात play store ची सुविधाही आहे

(टीप - bluestacks साठी संगणकामध्ये ग्राफिक्स कार्ड व साधारणतः १ gb पेक्षा जास्त RAM आवश्यक आहे.
डाउनलोड करण्यापूर्वी तुमच्या संगणकाची  comptibility तपासा.)

BlueStacks चे offline installer ही   www.bluestacks.com  वेबसाइट वर उपलब्ध आहे. साईज -  283MB

शनिवार, २३ मे, २०१५

windows साठी google चे मराठी टायपिंग सॉफ्‌टवेअर

संगणकावर मराठी युनिकोड टायपिंग करण्यासाठी google marathi input हे गूगल चे software सर्वोत्तम आहे.
स्पेलिंग टाइप केल्यानंतर आपोआप त्याचे मराठीत रुपांतर होते. ॲन्ड्रॉइडच्या गुगल हिंदी इनपुट या ॲप प्रमाणे हे काम करते.
     हे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी http://www.google.com/inputtools/windows/    या लिंक वर क्लिक करा.
    खालील प्रमाणे पेज येइल......

या पेजवर मराठी या ऑप्शनला टिक करा. व गुगलच्या नियम व अटी मान्यतेला ही टिक करा. (वरील प्रमाणे)
 व डाउनलोड  वर क्लिक करा.
859 kb ची एक फाइल डाउनलोड होइल, ती वर डबल क्लिक करा.( यावेळी संगणकास नेट चालु असणे गरजेचे आहे) 5 ते 10 MB डाटा डाउनलोड होइल, व त्याबरोबर तुमचे टायपिंग टुल ही install होइल.
windows+space दाबून तुम्ही मराठी व इंग्रजी टायपिंग मध्ये बदल करु शकता....


मंगळवार, १७ मार्च, २०१५

मराठी /हिंदी / इंग्रजी ई-पुस्तके ॲन्ड्रॉइड मोबाइलवरील ॲपकडून कशी वाचून घ्यावीत ? यासाठी चांगले ॲप कोणते ? हे माहिती करुन घेण्यासाठी येथे http://www.techgurumarathi.blogspot.in/p/e-books.html क्लिक करा. अथवा या ब्लॉगचे e-books हे पेज उघडा.

कागदावरील गणित स्कॅन करून सोडवणा-या free ॲप विषयी अधिक जाणण्यासाठी http://www.techgurumarathi.blogspot.in/p/apps.html   या लिंकवर क्लिक करा. अथवा या ब्लॉगचे स्मार्ट apps हे पेज उघडा.